

In his signature satirical style, British Nandy humorously comments on political speculation surrounding the Union Education Minister's post, weaving fictional conversations and sharp political wit into an entertaining column.
Sakal
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव धर्मेंद्र असूनही आणि आडनाव प्रधान असूनही त्यांचा झुरळांनी घास घेतला. त्यानंतर शिक्षणमंत्रिपदाच्या काटेरी खुर्चीत भक्त प्रल्हाद जोशी यांना बसवण्यात आले आहे. तथापि, भक्त प्रल्हादाप्रमाणे आपण उंबऱ्यावरच सेफ आहोत, असा स्टँड त्यांनी घेतल्याने पुन्हा नवा (आणि पर्मनंट) शिक्षणमंत्री शोधणे आले! तो शोध जवळपास संपल्यात जमा आहे हे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो.