

Dhing Tang: Dakoo vs Ladakoo..! A Satirical Take on Political Dynamics by British Nandi
Sakal
श्रद्धेय महाशोया महामॅडम सोनियाजी, सादोर प्रोनाम बिनीत निबेदन एई जे...आपनी केमॉन आछेन? दिल्लीतली आपली इंडिया आघाडीची बैठक आटोपून आमि काल राते देरी कोरे कोलकाता पोछेछी. कारण बिमान देरी कोरे एशेछि...खरे तर विमान वेळेवर निघाले असते, पण मी विमानाचे तिकीट काढले आहे, हे ओळखून विमान कंपनीने विनाकारण खोळंबा केला. विरोधकांना किती त्रास द्यायचा याला काही लिमिट? हेदेखील त्या निर्बाचनचोर ज्ञानेशकुमारांचेच उद्योग असणार!! धड जगू देत नाहीत. जाइ होक. (पक्षी : असो.)