ढिंग टांग : देशभर खुशी की लहर...

७.८ टक्के जीडीपी वाढीच्या ‘खुशी की लहर’वर ब्रिटिश नंदींची उपरोधिक फटकेबाजी; अर्थव्यवस्थेच्या आकड्यांवरून रोजच्या जगण्यातील विसंगतींची खिल्ली
7.8% GDP growth sparks a hilarious ‘Khushi Ki Lahar’!

7.8% GDP growth sparks a hilarious ‘Khushi Ki Lahar’!

Sakal

Updated on

एक तारखेला आम्ही जागे झालो तेच फटाक्याच्या आवाजाने. कुणीतरी ऐन जिन्यात डांबरी माळ लावली होती. घाबरून आम्ही न्हाणीघराकडे धावलो. टावेल खेचून बाहेर डोकावून पाहिले तो काय! घरोघरी कंदिल पेटलेले होते. दारोदारी रांगोळ्या काढल्या होत्या. नवनवीन पोशाख करुन जनलोक हास्यविनोदात रममाण झाले होते. आणखी थोडे डोके खिडकीबाहेर काढून आम्ही शेजारच्या नानांना विचारले, ‘‘का हो, नाना, कसला उत्सव?’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com