संन्यासाश्रम! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 21 मार्च 2017

उगीच नाही सांगत तुम्हाला
सगळी चक्रं ठरलेली असतात
एकातएक कड्या गुंतलेल्या,
अडकून गोल फिरत असतात

एक चक्र संपलं रे संपलं
की दुसरं लग्गेच सुरू होतंच
गाडी न्यूट्रलवर येण्याआधी
चार गिअर टाकणं होतंच

ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ
ह्यानंतर येतो, तो संन्यासाश्रम
स्टेप बाय स्टेप गेलात, तर
होणार नाही कसला भ्रम

ब्रह्मचर्यात माणूस शिकतो थोडं
जीवनाचं गणित मांडून बघतो
गुरुची विद्या फळाला आणून
बरीचशी अक्‍कल सांडून बघतो.

उगीच नाही सांगत तुम्हाला
सगळी चक्रं ठरलेली असतात
एकातएक कड्या गुंतलेल्या,
अडकून गोल फिरत असतात

एक चक्र संपलं रे संपलं
की दुसरं लग्गेच सुरू होतंच
गाडी न्यूट्रलवर येण्याआधी
चार गिअर टाकणं होतंच

ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ
ह्यानंतर येतो, तो संन्यासाश्रम
स्टेप बाय स्टेप गेलात, तर
होणार नाही कसला भ्रम

ब्रह्मचर्यात माणूस शिकतो थोडं
जीवनाचं गणित मांडून बघतो
गुरुची विद्या फळाला आणून
बरीचशी अक्‍कल सांडून बघतो.

शाळेत जातो, क्‍लास लावतो
जीवनाला भिडतो थेट
शिकता शिकता क्‍वचित कधी
शिलगावतो एखादी शिग्रेट

गृहस्थाश्रमात सगळं ठरल्याप्रमाणे,
चारचौघांसारखं आपलंही होतं
घर, नोकरी, बाईल, पोरं,
सगळं गणगोत गोळा होतं.

दोस्तलोक भेटतात, होतात गप्पा
संध्याकाळी एकत्र ‘बसतात’
जुन्यापान्या आठवणी काढत
सुखदु:खात ओली होतात

क्‍वचित एखादा एक्‍स्ट्रा कर्तृत्ववान
ॅरेनला जाऊन सेटल होतो
बाकी काहीच चुकत नाही, कारण
गृहस्थाश्रम तिथंही असतो

नंतर येतो डुलत वानप्रस्थ
त्याचं चक्र असतं निराळं
अभावातल्या भावासकट
विरत जातं मनातलं जाळं

वाटू लागतो संसार असार
कशासाठी हा गोतावळा?
कशाला हवी ही अडगळ आणि
कशाला रडायचं घळाघळा?

सगळं सोडून जंगलात जावं
कंदमुळं खाऊन राहावं
हरिनामाच्या अथांग सागरात
देहाला मग झोकून द्यावं

शंभर चुव्वे खाऊन झाल्यावर
बिल्ली निघते काशीला
सत्राशे गाठी पडतात,
संन्याश्‍याच्या शेंडीला

पूर्वाश्रमीचं तर्पण करून
चढवावी लागते भगवी छाटी
जुने पाश छाटून टाकून
सोडून द्यायची नात्यांची दाटी
क्‍वचित एखादा संन्यासी
लौकिकात रोवतो एक पाय
अध्यात्माच्या काठावरती
कश्‍शाला नाही म्हणत नाय!

तीन चक्र संपल्यावरती
चौथ्यामध्ये लाभते दाढी
संन्याश्‍याच्या दारी लागते
चार कड्यांची ऑडी गाडी!!

म्हणून म्हटलं-

उगीच नाही सांगत तुम्हाला
सगळी चक्रं ठरलेली असतात
एकातएक कड्या गुंतलेल्या,
अडकून गोल फिरत असतात

Web Title: Dhing tang editorial