

When pure Marathi leaves politicians speechless!
Sakal
प्रिय मित्रवर्य आणि मार्गदर्शक श्री. रा. नानासाहेब फडणवीस यांसी, सविनय जय महाराष्ट्र. पत्र लिहिण्यास कारण की काही गंभीर समस्या उपस्थित झाल्या आहेत. आणि म्हणूऽऽन तदनुसारच सदरील पत्र पाठवत आहे. गेले काही दिवस तब्येत थोडी नरम होती. पुण्यातील विद्यानंद बापट यांची शुद्ध मराठी ऐकून काही काळ आमचीच शुद्ध हरपली होती. आता बरे आहे. बापट यांच्या भाषेचा प्रचंड धसका आमच्या पक्षातील नेत्यांनी खाल्ला आहे. (मीसुद्धा खाल्ला आहे. खोटे का बोलू?) बरेच नेते तर हल्ली ‘प्रेस नकोच घ्यायला’ असे सांगत आहेत. तरी बरे आमच्या पक्षात एक असा प्रवक्ता नाही. आणि म्हणूऽऽन...जे काही असेल ते मीच बोलतो!