

Political Satire
Sakal
पाकिस्तानातील ल्यारीत जाऊन उत्पात घडवणाऱ्या धुरंधरची कहाणी आपण दोन भागात पाहिली. ‘यह नया भारत हय, घर में घुसेगा भी, मारेगा भी’ हा संदेश सर्वत्र गेल्याने भारतशत्रूंचे धाबे दणाणले. अनेक देशांनी घाबरुन आपापल्या गुप्तचर यंत्रणाच बंद करुन टाकल्या, अंडरवर्ल्डवाल्यांनी इडल्या विकायला सुरवात केली. सटरफटर सडकछाप गुन्हेगारांनी तर हायच खाल्ली. त्याच धुरंधराची तिसरी शौर्यकहाणी आता समोर येत आहे.