

The latest Dhing Tang column presents a humorous political satire on Maharashtra's changing political landscape and opposition strategies.
Sakal
नेमकी तीथ सांगावयाची तर ज्येष्ठातली ती एक षष्ठी होती. धुवांधार पाऊस पडत होता. मुंबईचाच पाऊस तो! बाहेर जावे तो पावसाने चिंब व्हावे, घरात यावे तो घामाने भिजावे, ऐसा काळ!
अशा उदास ढगाळ दिवशी घराबाहेर जावोच नये, ऐसा पोक्त विचार करोन राजियांनी बैठक मोडली नाही. (‘उदास ढगाळ दिवशी’ ऐवजी ‘उन्हातान्हात’ किंवा ‘मरणाच्या गारठ्यात’ हे शब्द वापरुन वाक्य तैसेच ठेवले तरी चालते!) घरातल्या घरात बैठकीवर बैसोन विश्वाची चिंता करावी, हा राजियांचा जुना छंद. आपणही समर्थांप्रमाणे फडताळात बैसोन ही क्रिया करावी, ऐसे त्यांना अधूनमधून वाटते. परंतु, त्यांच्या साइजची फडताळे मिळणे, सध्याच्या ‘मेक इन इंडिया’च्या काळात दुरापास्त झाले आहे. असो.