

The fictional dialogue ends with a symbolic twist, using a missing shoe to underline the absurdity of the situation.
Sakal
बेटा : (नेहमीप्रमाणे फिल्मी एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (काळजीने चूर होत) बरा आहेस ना? कुठं लागलं तर नाही ना? हल्ली तू बाहेर पडलास की भारी काळजी वाटते मला!!
बेटा : (दिलासा देत) कितनी परेशान रहती हो मेरे लिए, मम्मा! चिंता मत करो! दुश्मन को गाडकर ही रहूंगा! कोई माई का लाल मेरा कुछ भी नहीं बिगाड सकता!
मम्मामॅडम : (दोन्ही गालांवर हात ठेवत) गेल्या आठवड्यात तुला रस्त्यावर आडवं पडलेलं बघितलं आणि काळजाचा ठोका चुकला रे! पोलिसांनी किती जोरात ओढलं तुला! शी:...या सरकारचं तळपट होवो!! आग लागो असल्या हुकूमशाहीला!
बेटा : (विजयी मुद्रेने) लागलीच आहे! गेली की हुकूमशाही! टाटा, बाय बाय, खल्लास!! आता एक राजीनामा झाला आहे, दुसरा येईलच एवढ्यात! मी सोडतो की काय!! धिस हुकूमशाही गवर्न्मेंट विल बी ऑन द रोड इन नो टाइम!!