ढिंग टांग : एक दिवा आशीर्वादाचा..!

१७ सप्टेंबरच्या ‘आशीर्वादाचा दिवा’ अभियानातून रक्तदान, सेवा आणि दिव्यांच्या प्रकाशात नमोभावे भक्तीचा उत्सव; वडनगर ते वाराणसीपर्यंत उजळलेला विकासाचा मार्ग
Satirical Take on 'Aashirwad ka Diya' and Celebrations

Satirical Take on 'Aashirwad ka Diya' and Celebrations

Sakal

Updated on

दिल्ली आणि देशांतील लाखो शाळकरी मुलांसाठी १७ सप्टेंबरच्या पवित्र दिवशी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच या दिवशी ‘आशीर्वाद का दिया’ घरोघरी पेटवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ज्यांच्यापाशी पुरेसे आहे, त्यांनी रक्तदान करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. आम्ही तसे पुरेसे पुष्ट असलो तरी रक्तदान राहून गेले, पण दीपदान जरुर केले. आपण आपल्या दारी आशीर्वादाचा दिवा लावलात का? नसेल लावला, तर आत्ता उठा, आणि दिवा लावा!! एरवी जे दिवे आपण लावतो, त्यात आणखी एक भर असे म्हणून लावा!! महिनाभर दिवा लावण्याचा कार्यक्रम आहे. एक दिवस लेट झाल्याने काहीही बिघडत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com