

When political jabs turn into a toxic test!
Sakal
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. वेळ : सावध होण्याची!
राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंतःपुरात येरझारा घालत आहेत. तळहातावर मूठ हापटून ‘ही हिंमत? जीभ छाटीन!’ वगैरे उद्गार काढत आहेत. सावधगिरीने दरवाजा आणि खिडकीकडे आलटून पालटून नजर ठेवत आहेत. अब आगे...
उधोजीराजे : (अधीरतेने) कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : (लगबगीने येत मुजरा करत) महाराजांचा विजय असो! कशापायी याद केलीत?
उधोजीराजे : (कळवळून) गेले तीन घटका मी ‘पाणी द्या, पाणी द्या’ म्हणून टाहो फोडतोय, पण कुणी फिरकायला तयार नाही!!