संधी साधण्यासाठी लष्करी कुरापत

दक्षिण चिनी समुद्रातील मोहिमेदरम्यान जोरदार सलाम ठोकताना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदलाचे जवान.
दक्षिण चिनी समुद्रातील मोहिमेदरम्यान जोरदार सलाम ठोकताना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदलाचे जवान.

शेजारचा देश अडचणीत असताना त्याच्या सीमारेषा निश्‍चित करण्याचे धोरण चीनने आत्तापर्यंत राबविले आहे. कोरोनाचा उद्रेक आणि त्यामुळे बिकट झालेली आर्थिक स्थिती यातून संधी साधण्यासाठी चीन कुरापती काढत आहे. आपण चीनला त्यांच्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले पाहिजे. तशी भारताची क्षमताही आहे. देशात सरकार कोणाचेही असो, भारत कमकुवत धोरण अवलंबणार नाही, याची खात्री सगळ्या नागरिकांना पटली आहे. त्यामुळे चीनच्या या कुरघोडीला भारत चोख प्रत्युत्तर देईल. कारण, ३०-४० वर्षांपूर्वीचे भारतीय लष्कर आणि आत्ताचे लष्कर, यात खूप फरक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या म्हणण्यानुसार, गलवान खोऱ्यात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेपर्यंत चीनचे लष्कर येत असे. भारतीय जवानही तिथपर्यंत पोचत. हे अनेक वर्षे सुरू होते. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी केलेल्या कराराप्रमाणे हे सुरू होते. या दोन्ही सैन्य दलांनी शस्त्रे वापरायची नाहीत, असेही यात ठरले होते. यात काही वाद निर्माण झाल्यास ते वाटाघाटीने सोडवायचे, असेही यात निश्‍चित झालेले. पण, त्यांना आता भारत कमकुवत वाटत आहे. त्यामुळे त्यांनी या कुरापती सुरू केल्या आहेत. यात चीन कोणतीही मोठी मोहीम आखत नाही, तर फक्त लहान-लहान हालचाली करतो. गलवान हे त्याचेच उदाहरण आहे. गलवानमध्ये चीनचे लष्कर येत असे आणि तेथून परत फिरे. या वेळी मात्र ते मोठ्या संख्येने आले आणि तेथे तळ ठोकून राहिले. हे लक्षात आल्यानंतर लगेचच भारतीय जवानांनी त्यांना हटकले, त्यामुळे लगेचच तेथे धक्काबुक्की झाली.

जगाने घेतली उशिरा दखल
तिबेट व्यापून तेथे सत्ता प्रस्थापित केली तेव्हापासून चीनचे धोरण विस्तारवादी असल्याचे जगासमोर आले. भारताच्या उंबरठ्यापर्यंत आलेले हे संकट होते. पण, पुढील काही वर्षांत चीन इतका मोठा देश होईल, याची कल्पनाही कोणाला आली नव्हती. त्यामुळे जगाने चीनची उशिरा दखल घेतली. चीन आणि रशिया ही दोन्ही साम्यवादी राष्ट्रे आहेत, हे शीतयुद्धात पक्के झाले होते. त्यामुळे आशियाच्या दक्षिणेतील देशांशी संगनमत करण्याचे धोरण पाश्‍चिमात्य राष्ट्रांनी स्वीकारले होते. ‘कन्टेन्मेंट ऑफ कम्युनिझम’ असे १९४५ नंतर सुरू झालेले. आता इतर राष्ट्रे जे करीत होते, तेच आता चीन वेगळ्या स्वरूपात करीत आहे. तैवानवरचा हक्क चीनने सोडलेला नाही. दक्षिण चिनी समुद्रात चीनने सातत्याने ताकद वाढविली आहे. नौदलाची व्याप्ती वाढवून ते त्यांचा दबदबा आता हिंद महासागराच्याही पुढेपर्यंत वाढवत आहेत.
(शब्दांकन - योगिराज प्रभुणे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com