

Fake Tiger Attack Video Sparks Controversy
Sakal
वा घ.. जंगलातील सौंदर्याचे एक अद्भुत लेणे... ऐटदार चाल, भेदक नजर अन् जंगलाचा कोपरा
न् कोपरा दणाणून सोडणाऱ्या गगनभेदी डरकाळीमुळे त्याचे अस्तित्व ठळकपणे जाणवते.
कसलेले शिकारी असोत, किंवा शब्दसाधना करणारे लेखक अथवा चित्रकार... या प्राण्याने सर्वांनाच भुरळ घातली. शौर्याचा रुबाब मिरविण्यासाठी काहींनी त्याची शिकार करून कातडी सोलून त्याला दिवाणखान्यात टांगले; पण त्याच्या देखण्या रूपावर अनेकांनी प्रेमदेखील केले. तो जसा शिकारकथांचा नायक झाला, तसाच काव्यपंक्तींचाही विषय ठरला. त्याला आणि त्याच्या अधिवासाला संरक्षण द्यायला हवे, असा विचार पुढे येतो आहे. तो सर्वांच्या पचनी पडलेला दिसत नाही. माणूस-वन्यजीव संघर्षचा प्रश्न मिटलेला नाही, उलट त्यातील गुंतागुंत वाढत आहे. आता त्याच अधिवासामध्ये त्यानेच निर्माण केलेल्या; पण त्याच्या हातात न राहिलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) शिरकाव केल्याने वन्यजीवांचे अवकाशही बदलून जाण्याचा धोका आहे.