अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला आर्थिक आणि राजनैतिक पातळीवर अतिशय कुशलतेने मार्ग काढावा लागेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पन्नास टक्के आयातशुल्काच्या कुऱ्हाडीचा घाव अखेर भारतावर घातलाच. या महासत्तेबरोबरचे आपले संबंध किती ताणले गेले आहेत, याचे प्रत्यंतर ट्रम्प यांच्या या निर्णयातून आले आहे. भारत या संकटाचे संधीत रूपांतर करू शकतो का, ही बाब आता अत्यंत महत्त्वाची ठरेल.