
आयातशुल्काच्या झळांना झुळकांमध्ये बदलण्यासाठी भारताला नव्याने व्यूहनीती आखावी लागणार आहे.
देशांतर्गत काय किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण काय, तो शक्यतेच्या परिघातील खेळ आहे, असे म्हटले जाते. अमेरिकेने आयातशुल्कास्त्राने आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने ‘पाहा जरा पूर्वेकडे’ ही व्यूहनीती स्वीकारली, यात नवल नाही.