

Trump’s import duty on Basmati reveals political pressure tactics involving India–Russia ties and US–India trade dynamics.
Sakal
खारवलेले बदाम, पहिल्या पावसाचे थेंब पडलेल्या मातीचा वेडावणारा गंध आणि फुलांच्या गोडसर चवीचे विलक्षण मिश्रण असलेल्या, हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या सुपीक पात्रात पिकणाऱ्या लांब दाण्याच्या बासमतीचा सुगंध कुठल्याही खवय्याला मोहरून टाकतो. बासमतीचा हा सुगंध ‘बीएडीएच-२’ या जनुकातून तयार होणाऱ्या ‘टू-अॅसेटाईल वन-पायरोलीन’ या नैसर्गिक रासायनिक संयुगातून जन्मतो. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बासमतीच्या अलौकिक सुगंधामुळे अस्वस्थ झाले आहेत. त्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील वाढत्या राजकीय सौहार्दाचा सुगंध.