nitish kumar
sakal
भारतीय राजकारणाची बिहार प्रयोगशाळा आहे. धर्म, जात, पोटजात, उपजात, अतिमागास, मागास, मतदारांची वर्गवारी, उमेदवारांची वर्णवारी असे यच्चयावत सारे प्रयोग बिहारच्या राजकारणात निवडणूक जिंकण्यासाठी सतत सुरू असतात. औद्योगिकदृष्ट्या मागे राहिलेला बिहारी नागरिक राजकीय सजगतेत अव्वल असल्याचे सहज बोलतानाही आढळते.