कळतं पण वळत नाही!

काँग्रेसची गेल्या दहा वर्षात झालेली राजकीय हानी सहजासहजी भरून निघणार नाही. त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतील. तळापर्यंत पोचण्यासाठी संघटन मजबूत करावे लागेल.
Congress Strategy
Congress Strategy Sakal
Updated on

अग्रलेख

लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अहमदाबादेत झालेल्या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात काय व्यूहनीती ठरणार, याची उत्सुकता होती. देशात राजकीय पर्याय उभा राहायचा, तर कॉँग्रेसने उभारी घ्यायला हवी, असे अनेकांना वाटते. पण अद्यापही या पक्षाची अवस्था ‘कळतेय, पण वळत नाही’, अशीच असल्याचे अधिवेशनानंतर स्पष्ट झाले. याचे कारण ‘वळण्या’साठी म्हणजे संकल्प सिद्धीस आणण्यासाठी संघटनात्मक शक्ती तयार करावी लागते. त्या प्रयत्नांची वानवा अद्यापही दूर झालेली नाही. पक्षाच्या वाढीसाठी दोन गोष्टी आवश्यक. त्यातील एक म्हणजे वैचारिक प्रारूप.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com