
People gathered in huge numbers to bid an emotional farewell during the funeral ceremony.
Sakal
— सॅम्युअल जॉन्सन
पडद्यावरचा तारा राजकारणाच्या मैदानात उतरण्याचा प्रघात दक्षिणेकडील राजकारणात; विशेषतः तमिळनाडूतील राजकारणात नवीन नाही. प्रचंड प्रमाणात लोकप्रियता वाढू लागली की, अभिनेत्याच्या स्वतःविषयीच्या कल्पना आणि अपेक्षा वाढू लागतात. जनतेचे प्रश्न आपणच सोडवू शकू, आणि प्रस्थापित राजकीय पक्षांचे तण उपटून मतांचे भरघोस पीक काढू शकू, असे त्याला वाटू लागते. दक्षिणी चित्रपटांमधील ‘हीरो’ विजय हे सध्या याच मनःस्थितीत असून त्यांनी आयोजित केलेल्या सभेला लोटलेल्या प्रचंड गर्दीने त्याच्या महत्त्वाकांक्षांना आणखी धुमारे फुटणार, यात शंका नाही. पण गर्दी जमवणे तुलनेने सोपे असते, तिला योग्य दिशा देणे कठीण असते. हे राजकारणात तसेच प्रशासनाच्या बाबतीतही खरे आहे.