esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनविशेष -

१७४५ : शिंदे-होळकर या गाजलेल्या जोडीतील पराक्रमी वीर पुरुष राणोजी शिंदे यांचे निधन.

१९३८ : खगोलशास्त्र व खगोलभौतिकी या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म.

१९४७ : म्यानमारमधील नेते, उपाध्यक्ष आँग सान यांची रंगून येथे हत्या.

१९६९ : देशातील चौदा मोठ्या बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा अध्यादेश जारी.

२००१ : कसोटी क्रिकेटमधील सर्वांत भेदक आणि वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजविलेले वेस्ट इंडीजचे माजी कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट यांचे निधन.

हेही वाचा: राज्यात संसर्ग वाढतोय! दिवसभरात ९००० नव्या रुग्णांची नोंद

दिनमान -

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायातील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कर्क : राहत्या जागेचे व प्रॉपर्टीच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. कर्तृत्वाला संधी लाभेल.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. विरोधकांवर मात कराल.

तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. अपूर्व मनोबलावर कार्यरत राहाल.

धनू : आर्थिक सुयश लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मकर : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

loading image