

Dharmendra Deol
sakal
रवी पळसोकर
नव्या सहस्रकात पहिला ट्याहां करणारी मिलेनियल किंवा त्यानंतरच्या जेन झी पिढीला धर्मेंद्र ही चीज कदाचित सांगून कळणार नाही. पण आज जे साठी-सत्तरीत शिरले असतील, त्यांच्या काळजात नक्कीच कळ उमटली असेल. कारण त्यांच्यासाठी धर्मेद्र देओल हे केवळ चित्रपटांच्या नभांगणातल्या सिताऱ्याचे नाव नव्हते. त्या पिढीतल्या भारतीय मनातले ते मूर्तिमंत तारुण्य होते. देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या दशकभरात असंख्य सांस्कृतिक, सामाजिक उलथापालथी झाल्या. मनोरंजनाच्या विश्वात तर तो पुनरुत्थानाचाच काळ होता.