

Happy Diwali 2026 Send Heartwarming Diwali Wishes Greetings and Messages to Family Friends and Loved Ones This Festive Season
sakal
फटाक्यांच्या धुरामुळे नीटसे दिसत नसले तरी दीपावलीचे मंगलपर्व सुरू झालेले आहे. आकाशदिव्यांचा बऱ्यापैकी उजेड समाजमाध्यमांवर पडलेला दिसतो. अशा मंगलपर्वात एकमेकांना शुभेच्छा देण्याची आपली परंपरा आहे. भेटवस्तूंचे आदान प्रदानही होते. राजकीय नेते या काळात पत्रकारांना आवर्जून फराळ वा भेटवस्तू देतात. (वि. सू. : आमचा पत्ता खाली जोडत आहो!) शुभेच्छा देतात. वंदनीय मोदीजी बस्तर जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांसोबत दिवाळीचा फराळ करण्यासाठी गेले. दरवर्षी ते दिवाळी (न चुकता) फौजी बांधवांच्या सोबतच साजरी करतात. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याची जाम जळते. (काय जळते, काय विचारता? मनोवृत्ती जळते!!) सरहद्दी पलीकडील सैन्य आपल्या वंदनीय नायकासह लाडू-चिवडा खात असताना पाकड्यांना मात्र मेसचे अन्न खावे लागते. जळणार नाही तर काय?