
France Protests
Sakal
‘जे न-झी’ आंदोलनाच्या विषाणूमुळे अविकसित नेपाळमध्ये बेचिराख झालेल्या लोकशाहीचे अवशेष धगधगत असतानाच या विषाणूची लागण ‘लेट्स ब्लॉक एव्हरीथिंग’ नावाने थेट प्रगत युरोपातील फ्रान्सलाही झाली आहे. अर्थात, फ्रान्समध्ये असंतोष उफाळून येण्याचे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. पण फ्रेंच जनतेने अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन राजवटीच्या धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करण्यासाठी फ्रान्सच्या अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचार सुरू केला आहे. बेरोजगारी, महागाई, वाढती आर्थिक विषमता आणि बिघडलेल्या आर्थिक गणितावर सर्वसमावेशक तोडगा काढण्याची राज्यकर्त्यांची उदासीनता यामुळे फ्रान्सच्या रस्त्यांवर सर्वसामान्य जनतेला वारंवार उतरावे लागत आहे.