

Global Uncertainty and Its Impact on the Rupee
Sakal
जागतिक राजकारणातील अनिश्चितता, अस्थिरता यांचे प्रतिबिंब अर्थकारणात पडणार हे उघडच आहे. रुपयाने गाठलेली नीचांकी पातळी हे त्या परिणामांचे केवळ एक लक्षण आहे. रुपयाने सोमवारी डॉलरच्या तुलनेत नव्वदीचा उंबरठा गाठल्यानंतर या घसरणीविषयी चर्चा होणे स्वाभाविक म्हणावे लागेल. २०२५चाच विचार केला तर या काळात रुपया डॉलरच्या तुलनेत ४.३ टक्क्यांनी घसरला. एक प्रमुख कारण लगेचच डोळ्यासमोर येते, ते म्हणजे म्हणजे निर्यातीत झालेली घट आणि व्यापारतूट. चलनाच्या किंमतीतील चढउतार ही काही फार असाधारण गोष्ट नाही. परंतु रुपयाची घसरण ज्या सातत्याने होत आहे, ते पाहता या निमित्ताने अर्थव्यवस्थेतील काही प्रश्नांची आणि आव्हानांची चर्चा व्हायला हवी.