

India’s Push for Global South Representation
Sakal
एकीकडे जगाची रचना बहुध्रुवीय असावी, असे चाललेले प्रयत्न, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणतीच बांधिलकी न मानण्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा पवित्रा, तर तिसरीकडे स्वतःच प्रत्यक्ष युद्धात गुंतलेले रशियासारखे देश हे सध्याचे जगाचे चित्र आहे. त्यामुळे एखाद्या प्रश्नावर परस्परसहकार्य आणि समन्वयातून मार्ग काढणे हे आव्हानात्मक बनत चालले आहे. ‘जी-२०’ परिषदेत जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील संकल्प आणि आवाहनांचे नेमके काय होईल, हे सांगणे त्यामुळेच अवघड आहे.