अंगलट आलेले फुत्कार

सर्वांगीण विचार न करता निर्णय घेतले, तर काय घडते, याचे प्रात्यक्षिक सध्या जगात सुरू आहे आणि ट्रम्प त्याच्या केंद्रस्थानी आहेत.
Donald Trump
Donald TrumpSakal
Updated on

अग्रलेख 

‘गब्बर के ताप से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है, एक ही आदमी.... ! खुद गब्बर !!’ अशी वल्गना करणाऱ्या गब्बरसिंहाने त्याच्या तावडीतून सुटण्याचा उपाय तर सांगितला खरा; पण ताप देण्याच्या त्याच्या आवडत्या छंदातून रामगढच्या गावकऱ्यांची सुटका करावी, असे त्याला कधी वाटले नाही. पन्नास वर्षांपूर्वीच्या ‘शोले’ चित्रपटातील हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे डावपेच. गब्बरचा आव आणून आयातशुल्काचा ताप आणि मनस्ताप देत गेल्या ९० दिवसांपासून अवघ्या जगाचे ‘रामगढ’ करणाऱ्या ट्रम्प यांच्यावरच आपल्या तापदायक निर्णयांतून जगाला सोडविण्याची वेळ आली! कमालीच्या गुंतागुंतीच्या आर्थिक-राजकीय रचनेत एखादा निर्णय घेताना सर्वांगीण विचार करावा लागतो. तो नाही केला तर काय होते, याचे हे निदर्शक. चीनला धडा शिकविण्याच्या ईर्षेने पछाडलेल्या ट्रम्प यांनी धडाधड आयातशुल्क वाढवायला सुरुवात केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com