narendra modi and vladimir putin
sakal
भारत आणि रशियाने आर्थिक आणि व्यापारी भागीदारी मजबूत करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो महत्त्वाचा आहेच; पण आपले धोरणात्मक स्वातंत्र्य झाकोळणार नाही, याबाबत भारत दक्ष आहे, हा संदेश त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा.
भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री पारंपरिक असली तरी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचा ताज्या भारत दौऱ्याचे आणि त्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेचे महत्त्व सद्यःपरिस्थितीत अनन्यसाधारण आहे. या निमित्ताने भारताने जगाला; विशेषतः अमेरिकेला दिलेला संदेश आहे तो परराष्ट्रविषयक, सामरिक धोरणाच्या स्वायत्ततेचा.