

India economic survey 2025-26
sakal
जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या दोलायमान परिस्थितीत अर्थव्यवस्थेला चालना द्यायची तर नवे मार्ग शोधावे लागतील आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे देशांतर्गत सुप्त क्षमतांचा विकास साधण्यासाठी सर्व शक्तीला पणाला लावावी लागेल, याची जाणीव केंद्राच्या २०२५-२६ च्या आर्थिक सर्वेक्षणातून दिसून येते. यापुढची वाटचाल आणि रविवारी सादर होणारा अर्थसंकल्प याच उद्दिष्टावर भर देणारा असेल, अशी दाट शक्यता आहे. आर्थिक पातळीवरील क्षितिज निराशेने काळवंडलेले नाही, मात्र प्रतिकूल बाबींचा परिणाम कमीत कमी व्हावा आणि अनुकूल संधींचा जास्तीत जास्त फायदा उठवता यावा, हा दृष्टिकोन त्यात व्यक्त झाला आहे. एक दार बंद झाले तर विचलित व्हायचे नसते, कारण इतर ठिकाणच्या खिडक्या तरी उघडतात.