अग्रलेख : गिरे तो भी टाँग ऊपर!

भारताविरुद्ध सामना खेळण्यास पाकिस्तानला अखेर राजी व्हावे लागले आणि गुर्मी जिरली.
T20 world cup 2026

T20 world cup 2026

sakal

Updated on

भारताविरुद्ध सामना खेळण्यास पाकिस्तानला अखेर राजी व्हावे लागले आणि गुर्मी जिरली. तिथल्या सत्ताधाऱ्यांचा मुखभंग झाला.

सीमापार शत्रुत्वाची किनार लाभल्याने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात प्रेक्षकांना जी झिंग चढते, त्याची बरोबरी इतर कुठल्याच स्पर्धेशी होत नाही. ऐंशीच्या दशकात भारतीय संघावर पाकिस्तान वर्चस्व गाजवायचा. पण नव्वदीच्या दशकापासून सतत खचणाऱ्या अर्थव्यवस्थेसोबत पाकिस्तानचे क्रिकेटही गाळात गेले आणि त्याच कालखंडात भारताचा दोन्ही आघाड्यांवर उत्कर्ष होत गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com