

India US interim trade agreement impact
sakal
भारत व अमेरिका यांनी हंगामी का होईना व्यापारकरार करून एक कोंडी फोडली. त्याचा तपशील निश्चित व्हायचा असला आणि कराराला अंतिम स्वरूप मिळणे अद्याप बाकी असले तरी दोन्ही देशांनी काढलेल्या संयुक्त निवेदनावरून ज्या बाबी समोर आल्या आहेत, त्यांची नोंद घ्यायलाच हवी. अमेरिकेने पन्नास टक्के आयातशुल्क लावल्याने भारताच्या तेथील निर्यातीला धक्का बसणे साहजिकच होते. आता झालेल्या करारानुसार हे शुल्क अमेरिकेने आता अठरा टक्क्यांवर आणल्याने भारतातील वस्त्रोद्योग,चामड्याच्या वस्तू, दागदागिने असे जिन्नस निर्यात करणाऱ्या भारतातील उद्योगांना दिलासा मिळणार आहे. आणखी एक ठळक बाब म्हणजे व्यापार करारात भारताकडून झालेला कृषी क्षेत्राचाही समावेश.