राज्याच्या तिजोरीवर असह्य ताण आल्यावर सरकारला खाडकन जाग आलेली दिसते.
मतांसाठी लोकानुनय करायचे ठरवले की, आपल्या लोकशाहीतील स्पर्धा कोणत्या धोकादायक वळणावर जाऊ शकते, याचे उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’कडे बोट दाखवावे लागेल.