Rising Leopard Attacks Across Maharashtra
sakal
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. हे हल्ले थांबता थांबेनात. पुणे, अहिल्यानगर, नाशिक आदी जिल्ह्यांतील ग्रामीण आणि शहरी वस्त्यांमध्येही बिबट्यांचा मुक्त संचार आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात २५० हून अधिक नागरिक आणि १७ हजार पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. बिबट्याच्या दहशतीच्या मुद्याकडे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सदस्यांनी सरकारचे लक्ष वेधले. बिबट्याने इतकी दहशत निर्माण केली आहे की, लोक दिवसाही शेताकडे जायला तयार नाहीत.