Local Self-Government Institutions election
sakal
संधीसाठी दार ठोठावणाऱ्यांची संख्या सर्वच पक्षांत जास्त असणार. ते स्वाभाविकही आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही तळातील राजकीय कार्यकर्त्यांसाठी एक महत्त्वाची संधी असते. या निवडणुका प्रामुख्याने स्थानिक प्रश्नांवर लढवल्या जात असल्याने पक्षीय अभिनिवेशापेक्षा त्या प्रश्नांची जाण, लोकसंपर्क यांना जास्त महत्त्व असते. याचे भान राजकीय पक्षांनी बाळगणे आवश्यक असते.