Eknath Shinde and Ajit Pawar
लोकसभा, विधानसभा निवडणुका होऊन गेल्या तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय झाला नाही. आता स्थानिक संस्था निवडणुकाही त्या निर्णयाविनाच होणार.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, या वादावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालांना आव्हान देणाऱ्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांवरील अंतिम सुनावणी आणि निकाल आता नव्या वर्षातच लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्याच्या राजकारणातील दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष.