महाराष्ट्राला या घडीला सर्वाधिक गरज आहे ती आर्थिक शिस्तीची, याचे भान विसरता कामा नये.
महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी सुरू असलेल्या चर्चेचे विषय भाषा, संस्कृती, घराणी, दगाबाजीचे आरोप-प्रत्यारोप वगैरेंमध्येच घुटमळताना दिसत असताना विधिमंडळात महायुती सरकारकडून मांडण्यात आलेल्या ‘पुरवणी मागण्या’ म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीचे एक प्रकारचे आक्रंदनच म्हणावे लागेल.