

Political Arrogance and the Fall of Power
sakal
महायुती सरकारच्या गळ्यातला ‘माणिकमोती’ असलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून अखेरीस हकालपट्टी झाली. त्यासाठी विरोधकांना श्रम घ्यावे लागले नाहीत, तर स्वतःच खोदलेल्या खड्डयात ते जाऊन पडले. सरकारच्या वर्षभराच्या काळात त्यांनी यापूर्वीही असे खड्डे खणले होते; परंतु त्यांना प्रत्येक वेळी उपमुख्यमंत्री आणि त्यांचे नेते अजित पवार यांनी हात देऊन वर काढले. कृषिमंत्री असताना ‘ओसाड गावची पाटीलकी’ किंवा ‘भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही’ अशा प्रकारच्या त्यांच्या बेताल वक्तव्यांकडे जणू द्वाड बालकाच्या वाभरट बोलण्याकडे त्याचे पालक दुर्लक्ष करतात, तसे दुर्लक्ष केले गेले. मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांच्या या असल्या उपद्व्यापांकडे कानाडोळा करत महायुतीतली अपरिहार्यता मान्य केली होती.