mumbai marathi sahitya sangh election
sakal
नअस्कार! मराठी साहित्यविश्वात हल्ली काय काय घडेल, सांगता यायचं नाही. मी तर पार हादरुन गेल्ये आहे. एकेक बातम्या अशा काही धडकू लागल्या आहेत की छातीत धडकीच भरावी. हा मजकूर वाचून झाल्यानंतर (सकाळीच वाचलात तर-) काही तासातच गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षपदी डॉ. उषाताई तांबे या निवडून आल्याचं तुम्हाला कळेल! उषाताईंचं मी ॲडव्हान्समध्येच अभिनंदन करुन टाकत्ये!