

Naxalites
केवळ नक्षलवादी संपवून चालणार नाही, तर त्या विचाराला मूठमाती देण्यासाठी नक्षलपीडित क्षेत्रापर्यंत विकासाचा उजेड पोहोचला पाहिजे.
गेल्या साठ वर्षांपासून भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका असलेली माओवादी चळवळ पूर्णतः संपल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केली. दोन वर्षांपूर्वी छत्तीसगडमधील एका बैठकीत शहा यांनी या उद्दिष्टासाठी ‘डेडलाइन’ जाहीर केली होती, ती २०२६च्या मार्चअखेरची. त्यानंतर केंद्र सरकारने नक्षलग्रस्त राज्यांच्या सरकारांना विश्वासात घेऊन रणनीती आखली.