

Nitish Kumar’s Political Journey and Leadership in Bihar
Sakal
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वाभाविकच त्यांच्यापुढील राजकीय आणि आर्थिक आव्हानांची चर्चा सुरू झाली आहे. नितीशकुमार यांच्या समता पक्षाला किंवा संयुक्त जनता दलाला आजवर राज्यात कधीच स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. २०१०मध्ये जिंकलेल्या ११५ जागा ही संयुक्त जनता दलाची आजवरची सर्वोत्तम कामगिरी. पण कितीही जागा जिंकल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच, हे गेल्या वीस वर्षांपासूनचे समीकरण सदैव कायम राहिले आहे. स्वतःचा पक्ष अल्पमतात असूनही दोन दशके राज्याचे मुख्यमंत्रिपद आपल्या हाती ठेवण्याची किमया देशातील कुठलाही नेता साधू शकलेला नाही.