

Asim Munir, Chief of Defence Staff, rising as Pakistan’s powerful military leader amid Imran Khan’s imprisonment and political unrest.
sakal
पाकिस्तानात हुकूमशाही प्रवृत्ती, हिंसाचार, आर्थिक दुरवस्था या सर्वच गोष्टींच्या बाबतीत आता नव्याने सांगण्यासारखे काही नाही. याचे कारण देशाच्या स्थापनेपासूनच त्या देशाचा इतिहास हेच ओरडून सांगतो आहे. त्यात सुधारणा घडली नाही. ज्यांनी तसे प्रयत्न केले, त्यांना नामोहरम करण्यात आले. हा देश भारताचा शेजारी असल्याने तेथील घडामोडींची गांभीर्याने दखल घ्यावी लागते. लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी स्वतःकडे अमर्याद अधिकार घेऊन लोकशाहीच्या अवशेषांच्याही चिंधड्या उडविण्याचा विडा उचललेला दिसतो. या पार्श्वभूमीवर तुरुंगात डांबण्यात आलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयीच्या अफवांना ऊत आला आहे.