Pune University : परीक्षेच्या गुणदानाचे संकेतस्थळ ‘हॅंग’

विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांसह विविध विषयांचे गुणदान करण्यासाठी परीक्षा विभागाच्या वतीने एक संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Pune University
Pune Universitysakal

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत सध्या हिवाळी सत्राच्या परीक्षा चालू आहे. परीक्षांचे गुणदान करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने जे ऑनलाइन संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले होते. ते सातत्याने हॅंग होत असल्याची माहिती प्राध्यापकांनी दिली. मात्र, संबंधित अडचण मागील आठवड्यातच दुरुस्त केल्याचा दावा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केला आहे.

विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांसह विविध विषयांचे गुणदान करण्यासाठी परीक्षा विभागाच्या वतीने एक संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर संबंधित महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे विषयानुसार गुणदान करणे गरजेचे आहे. यासाठी बुधवार (ता.२०) पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, गुणदान करण्यासाठीचे संकेतस्थळ सातत्याने बंद पडणे, हॅंग होणे, एरर दाखविणे अथवा लॉगआऊट होण्याचे प्रकार वाढले होते.

पर्यायाने विद्यार्थ्यांचे गुणदान वेळेत करण्यास महाविद्यालयांना अडचणींचा सामना करावा लागला होता. याबद्दल बोलताना पुण्यातील एका महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणतात, ‘संकेतस्थळ सातत्याने बंद पडते. दहा विद्यार्थ्यांचे गुणदान होईपर्यंत साईटवरून आम्ही लॉगआऊट झालेले असायचो. त्यामुळे प्राध्यापकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

या संदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा विभागालाही कळविण्यात आले आहे.’ मागील सत्रामध्ये वेळेत गुणदान न केल्यामुळे परीक्षांच्या निकालाला उशीर झाला होता. ज्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या प्रवाशांना बसला होता.

संकेतस्थळासंबंधीच्या समस्यांमुळे प्राध्यापकांना मनस्ताप सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या गुणदानास विलंब झाल्यास निकाल लांबतो. पर्यायाने याचे खापर थेट महाविद्यालयांवर फोडले जाते. आमची चूक झाल्यास हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो. मात्र, विद्यापीठानेही आपली यंत्रणा निकोप असल्याची खात्री करावी.

- एक प्राध्यापक

मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या परीक्षांमुळे मागील आठवड्यापर्यंत संकेतस्थळा संबंधी समस्या होत्या. मात्र आम्ही हार्ड डिस्क आणि रॅम वाढवली आहे. त्यामुळे आता तो प्रश्न निकाली निघाला असून, संकेतस्थळावर येणाऱ्या अडचणीही दूर केल्या आहेत.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com