
रेवड्यांच्या राजकारणाला नाके मुरडली तरी या ‘शॉर्टकट’ला बगल देणे, हे आता आपल्या देशात तरी कुणाच्या हातात उरलेले नाही. कल्याणकारी योजनांच्या नावाखाली सोयीचा काळवेळ पाहून नागरिकांच्या खात्यात थेट पैसा टाकणाऱ्या अनेक योजना गेल्या काही वर्षात लोकप्रिय झाल्या. अर्थव्यवस्थेचा किंचितही विचार न करता केवळ लोकानुनयासाठी अशा योजनांचे पेव फुटले. आज परिस्थिती अशी आहे की चार व्यवहारिक युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्या सुज्ञ अर्थतज्ञांनाही कुणी विचारीनासे झाले आहे. महाराष्ट्रात अल्पावधीत लाडकी ठरलेली लाडकी बहीण योजना ही अशाच काही योजनांपैकी एक.