

“A glimpse into the Pressure Experiment – testing human limits under stress.”
Sakal
मानवी इतिहासाचा प्रवाह चक्राकार पद्धतीने पुढे जातो, यावर ज्याचा विश्वास आहे, त्यांचा समज आणखी घट्ट व्हावा, अशा पद्धतीने अनेक घटना घडत आहेत. एकेकाळी जी महासत्ता जागतिकीकरणाच्या मुळाशी असलेल्या खुल्या व्यापाराच्या तत्त्वाविषयी विविध देशांना प्रवचने देत होती, तीच आता घायकुतीला येऊन काही बाबतीत कुंपणे बांधण्याच्या धांदलीत मग्न आहे. एकीकडे लोकशाही देश म्हणून भारताशी असलेल्या सौहार्दाचे गोडवे गायचे आणि त्याचवेळी व्यापारात फायदा व्हावा, यासाठी भारताविरुद्ध दबावतंत्राचा वापर करायचा असे दुहेरी धोरण सध्या अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वीकारलेले दिसते. चीन, मेक्सिको आदी देशांकडून अमेरिकेच्या मागण्या मान्य न होता उलट प्रत्युत्तर मिळाले.