अग्रलेख : अणुऊर्जेची कुंडले

जागतिक राजकारणाच्या पटावर अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे तेलाची ऊर्जा! आजच्या युगात ज्याच्याकडे ऊर्जेच्या स्रोतावर नियंत्रण आहे, तोच जगाचा खरा सत्ताधीश आहे.
Nuclear Energy

Nuclear Energy

esakal

Updated on

कल्पक्कम अणुऊर्जाप्रकल्पाने नवा इतिहास घडविला. ज्या तंत्रज्ञानापुढे जगाने हात टेकले, तिथे भारतीय प्रज्ञेने ‘फास्ट ब्रीडर’च्या रूपाने ऊर्जेचा एक अक्षय्यस्रोत प्रज्वलित केला आहे. त्यासाठी दोन दशकांचे परिश्रम कारणीभूत आहेत.

जागतिक राजकारणाच्या पटावर अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे तेलाची ऊर्जा! आजच्या युगात ज्याच्याकडे ऊर्जेच्या स्रोतावर नियंत्रण आहे, तोच जगाचा खरा सत्ताधीश आहे. या पार्श्वभूमीवर कल्पक्कममधील ‘प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर’ (पीएफबीआर)मध्ये ‘क्रिटिकॅलिटी’ गाठली, तेव्हा केवळ एका टप्प्याची पूर्तता झाली नाही, तर भारताच्या ऊर्जास्वातंत्र्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com