

USA-India trade negotiation impact on cotton and textiles
sakal
व्यापार वाटाघाटी, करार यांबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शैली एव्हाना जगाला कळून चुकली आहे. सुरुवातीलाच आपल्याला अनुकूल अशा अटी, शर्ती आणि तरतुदी जाहीर करून मोकळे व्हायचे. प्रतिक्रियांचा अंदाज घ्यायचा. त्या खूपच तीव्र असतील तर काही बाबतीत माघार घेतल्यासारखे करायचे. या शैलीनुसार अमेरिकी सरकारने भारताच्या बाबतीत आधी जारी केलेल्या निवेदनातील भाषा आता थोडीशी सौम्य केली असून, पुढच्या पाच वर्षांत पाचशे अब्ज डॉलरच्या वस्तू-सेवांची खरेदी अमेरिकेकडून करण्याचा ‘मनोदय’ (बांधिलकी नव्हे) भारताने व्यक्त केल्याचे अमेरिकेने सुधारित मसुद्यात नमूद केले आहे.