What Is Trump’s ‘Gold Card’ and How It Works
editorial-articles
अग्रलेख - डॉलरच्या देशा!
‘गोल्ड कार्ड’द्वारे ट्रम्प यांनी जगातील बुद्धिवंत व भांडवलदारांना अमेरिकेचा ‘गेटपास’ दिलेला आहे. पण त्यातून सरकारचा उद्देश साध्य होईल का?
एकेकाळी जगाच्या वेगवेगळ्या भागांतून नशीब काढण्यासाठी येणाऱ्या सर्वांसाठी अमेरिका स्वागतशील होती. कर्तृत्व गाजवा, गुणवत्ता जोपासा, संपत्ती निर्माण करा, हाच मंत्र प्रभावी ठरत होता आणि त्यातूनच खरे तर या देशाला घडवले, समृद्ध केले. हे करताना रंग, वंश, भाषा, प्रदेश यांचे वैविध्य आड येत नव्हते. उलट या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या ‘मेल्टिंग पॉट’ची उपमा अमेरिकेला दिली जात होती. त्यामुळेच ‘जागतिकीकरणाचा जयजयकार’ करताना अमेरिकच्या पाठीशी या पूर्वेतिहासाचे पाठबळ होते. पण काळ बदलला.
