india russia friendshipsakal
editorial-articles
अग्रलेख : मैत्रीचे चलन
ऐन बहरात असलेल्या भारत-रशिया व्यापारात अमेरिका खोडा घालू पाहात आहे.
ऐन बहरात असलेल्या भारत-रशिया व्यापारात अमेरिका खोडा घालू पाहात आहे. पण अमेरिकेच्या दबावाला बळी पडून भारताने आपला पारंपरिक मित्र गमावता कामा नये.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वव्यापी धुमश्चक्रीमुळे सत्तासमीकरणे सतत बदलत असतात. जगात कायमचा मित्र वा कायमचा शत्रू कोणी नसतो; शाश्वत असतात ते हितसंबंध, असे म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर अनेकदा येते.