
Viksit Maharashtra 2047' Aims for $5 Trillion Economy and Global Leadership
Sakal
यापुढच्या २२ वर्षांसाठी पथदर्शन करणाऱ्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दस्तऐवजाच्या मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीने सोमवारी २० ऑक्टोबरला मंजुरी दिली. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी एप्रिलमध्ये सुरू झालेले काम दस्तएेवजाच्या मसुद्यापर्यंत पोहोचले आहे. आता हा मसुदा राज्य मंत्रिमंडळासमोर सादर होईल. मंत्रिमंडळाच्या सूचना, मान्यतेनंतर दस्तएेवज अंमलात येईल. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्राने देशात आणि जगात प्रबळ राज्य म्हणून उभे राहावे, यासाठी हा दस्तएेवज मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने ठरवलेली उद्दिष्टे महत्त्वाकांक्षी आहेत.