दे मला मुका...! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 17 एप्रिल 2018

स्थळ : मातोश्री प्यालेस, वांद्रे संस्थान.
वेळ : नाजूक! काळ : साजूक.
प्रसंग : लाजूक! पात्रे : वाजूक...म्हंजे नेहमीचीच!
..............................
सौभाग्यवती कमळाबाई अधीरतेने वाट पाहात आहेत. दालनाच्या दाराकडे डोळे लावून बसल्या आहेत. मधूनच उठून ‘छे किती उशीर...’ असं पुटपुटतात. खिडकीशी जाऊन दुर्बिणीने काही हालचाली बघतात. तेवढ्यात साक्षात उधोजीराजे ताडताड पावलं टाकून प्रवेश करतात. अब आगे.
उधोजीराजे : (जरबेनं) आम्हाला याद केलंत?
कमळाबाई : (खोट्या प्रेमाच्या उमाळ्यानिशी) कित्ती उशीऽऽर...आम्ही केव्हाची वाट बघत बसलो आहोत इथं!!

स्थळ : मातोश्री प्यालेस, वांद्रे संस्थान.
वेळ : नाजूक! काळ : साजूक.
प्रसंग : लाजूक! पात्रे : वाजूक...म्हंजे नेहमीचीच!
..............................
सौभाग्यवती कमळाबाई अधीरतेने वाट पाहात आहेत. दालनाच्या दाराकडे डोळे लावून बसल्या आहेत. मधूनच उठून ‘छे किती उशीर...’ असं पुटपुटतात. खिडकीशी जाऊन दुर्बिणीने काही हालचाली बघतात. तेवढ्यात साक्षात उधोजीराजे ताडताड पावलं टाकून प्रवेश करतात. अब आगे.
उधोजीराजे : (जरबेनं) आम्हाला याद केलंत?
कमळाबाई : (खोट्या प्रेमाच्या उमाळ्यानिशी) कित्ती उशीऽऽर...आम्ही केव्हाची वाट बघत बसलो आहोत इथं!!
उधोजीराजे : (घुश्‍शात) आम्ही सांगितलं नव्हतं वाट बघायला!!
कमळाबाई : एक माणूस आमच्यावर भारी रागावलंय वाटतं?
उधोजीराजे : (पाठ फिरवून रागारागानं) चटकन काय मसलत असेल ती सांगा! आम्हाला सवड नाही!!
कमळाबाई : (मखलाशी करत) सवड नाही? सवड मिळावी, म्हणून तर सारा कारभार आमच्या हाती दिलात ना?
उधोजीराजे : (विषण्ण मुद्रेने) तेच चुकलं आमचं!!
कमळाबाई : (लाडात येत) तुम्ही परदेशी निघून गेलात, इथं विरहानं आम्हाला जेवण जात नव्हतं!!
उधोजीराजे : (छद्‌मीपणानं) मग उपाशी राहिलात?
कमळाबाई : (नाक मुरडत) उपाशी राहील आपला दुश्‍मन!! रोज तीन डझन आंबे खाऊन दिवस काढतेय!!
उधोजीराजे : (हबकून) त..त...तीन डझन? अहो, अजीर्ण होईल ना!!
कमळाबाई : एक महत्त्वाची मसलत कानावर घालायची होती! तुम्ही इथं नव्हता, तेव्हा आम्हाला फार्फार भोगावं लागलं!! नाही नाही ते बोल ऐकावे लागले!!
उधोजीराजे : (आवंढा गिळत) कोण काय म्हणालं आता?
कमळाबाई : (तक्रारीच्या सुरात) तुमचे ते संजयाजी राऊत! तुम्ही मुलखगिरीवर गेलेले असताना आम्हाला वाट्‌टेल तसं बोलतात!! अपमान करतात!! हेटाळणी करतात आमची!! वास्तविक आपलं किती छान जमतं!! पण तुमच्या काही सरदारांना बघवतच नाही मेलं! त्यांचं घर किनई उन्हात बांधा!!
उधोजीराजे : (सावध होत) बरं, बरं, बांधू!! पण काय म्हणाले ते?
कमळाबाई : (आगीत तेल ओतत) म्हणाले की सध्या साहेबांचं आणि कमळाबाईंचं चांगलंच बिनसलं आहे, ह्यावेळी तोंडमिळवणी शक्‍यच नाही म्हणे!! काडीमोड अगदी ठरलेला आहे...असं म्हणाले ते!!
उधोजीराजे : (आणखी सावध होत) एवढंच ना?
कमळाबाई : एवढंच असतं तर सहन केलं असतं आम्ही! पण ते म्हणाले...ते म्हणाले..की...की...शी:!! उच्चारायचीसुद्धा लाज वाटते!!
उधोजीराजे : (विरघळत) आमच्यासमोर कसली आलीये लाज?
कमळाबाई : ते म्हणाले की काडीमोड झाल्यात जमा आहे! आता हातमिळवणी नाही की तोंडमिळवणी नाही!! आता त्यांनी मुका घेतला तरी नाही!!
उधोजीराजे : (धक्‍का बसून) क्‍काय? मुका?
कमळाबाई : (मान हलवत) हं...म...म...मुकाच!!
उधोजीराजे : (घाबून) कोणी कोणाचा घ्यायचा...मुका?
कमळाबाई : (लाजून) इश्‍श! स्वारीच्या जिभेला काही हाड!!
उधोजीराजे : (अजीजीनं) अहो, हे भयंकर आहे!! मुका कोण कोणाचा घ्यायला बसलंय इथं? राजकारणात असं कुठं असतं का?
कमळाबाई : हेच म्हणत होत्ये मी!! तुम्ही त्या संजयाजींना चांगलं खडसावा बघू! म्हणावं, तोंड बंद ठेवा आता काही दिवस!! नाहीतर...
उधोजीराजे : (गोंधळून) नाहीतर काय..?
कमळाबाई : (खिडकीकडे झटकन वळत) नाहीतर म्हणावं, कमळाबाईंना तोंड बंद करण्याचे उपाय चांगले माहीत आहेत! सांगाल ना?

Web Title: editorial dhing tang british nandi article