सेल्फगोल! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 26 जून 2018

ती : अहो..!
तो : हं!
ती : टीव्हीचा रिमोट कुठाय?
तो : ....
ती : द्या ना!
तो : ....
ती : बिग बॉस मराठी लावा ना!
तो : थोड्या वेळानी!
ती : थोड्या वेळानं रेशम, सईमधलं भांडण मिटलं तर काय उपयोग?
तो : नाही मिटणार!
ती : कशावरून?
तो : रिमोट मिळणार नाही! तुला आधीच सांगितलं होतं...
ती : काय?
तो : फिफा वर्ल्डकप सुरू झाला की महिनाभर टीव्ही माझा! तुम्ही लोक माझ्या अटी पाळत नाहीआत!
ती : कसल्या डोंबलाच्या अटी?
तो : मी मॅच बघत असताना टीव्हीसमोर येऊन उभी राहू नकोस असं तुला मी गेल्या ३४ मॅचेसच्या वेळी सांगितलं आहे!!

ती : अहो..!
तो : हं!
ती : टीव्हीचा रिमोट कुठाय?
तो : ....
ती : द्या ना!
तो : ....
ती : बिग बॉस मराठी लावा ना!
तो : थोड्या वेळानी!
ती : थोड्या वेळानं रेशम, सईमधलं भांडण मिटलं तर काय उपयोग?
तो : नाही मिटणार!
ती : कशावरून?
तो : रिमोट मिळणार नाही! तुला आधीच सांगितलं होतं...
ती : काय?
तो : फिफा वर्ल्डकप सुरू झाला की महिनाभर टीव्ही माझा! तुम्ही लोक माझ्या अटी पाळत नाहीआत!
ती : कसल्या डोंबलाच्या अटी?
तो : मी मॅच बघत असताना टीव्हीसमोर येऊन उभी राहू नकोस असं तुला मी गेल्या ३४ मॅचेसच्या वेळी सांगितलं आहे!!
ती : तिकडे ठेवलेली वस्तू कशी घ्यायची मग?
तो : रांगत जा!
ती : अडलंय माझं खेटर! तो रिमोट द्या !!..हा कागद का दाखवताय?
तो : यलो कार्ड दाखवतोय! बाचाबाची, दांडगाई करणाऱ्याला दाखवतात आमच्यात! जास्त आवाजी केली तर लाल कार्ड दाखवीन!..आऊट!!
ती : फू:!! ठेवा तुमच्याकडेच ती कार्ड! काय तरी मेला पोरकटपणा!!
ती : फिफा काय काय म्हणालात, मग हे काय बघताय?
तो : फुटबॉल!
ती : त्यात काय मेलं बघायचं? कोणाची म्याच आहे?
तो : कुणाची का असेना...तुला काय?
ती : तो जट आलेला माणूस तिथं काय करतोय?
तो : जट?
ती : नाही तर काय! दोन वर्षांमागे हरिद्वारला बघितला होता असा साधू!!
तो : तो कोलंबियाचा स्ट्रायकर आहे!
ती : अय्या...स्ट्रायकर क्‍यारममध्ये असतो ना?
तो : तो वेगळा!
ती : तो त्या जाळ्याच्या खांबाशी उभा माणूस एकटाच तिकडे काय करतोय?
तो : त्याला गोलकीपर म्हणतात बाई!
ती : किती गोल झाले?
तो : अजून नाही..!
ती : सेंच्युरी होईल का?
तो : फुटबॉलमध्ये सेंच्युरी नसते!
ती : कोण जिंकणार आहे?
तो : ते सांगता येत असतं तर मी कोट्यधीश झालो असतो!
ती : मागल्या खेपेला एक आक्‍टोपस सांगायचा म्हणे! कोण जिंकणार ते!! मुक्‍या प्राण्याला कळतं ते तुम्हाला नाही कळत?
तो : नाही कळत...काय करू?
ती : तुमच्या फुटबॉलमुळे माझी सीरिअल जाते!
तो : एक महिना कळ सोस!
ती : फुटबॉल आणि क्रिकेट दुसरं काही कळत नाही का तुम्हाला?
तो : तुझ्या मालिकांमध्ये कळण्यासारखं काय असतं?
ती : शेजारचे जोशी बघा, रात्री साडेदहाला टीव्ही बंद करून झोपतात!
तो : तुला काय ठाऊक?
ती : टीव्हीचा आवाज बंद होतो त्यांचा! रिमोट द्या बऱ्या बोलानं!
तो : नाही देणार! कटून पडलो तरी बेहतर!!
ती : अच्छा? बघा हं..!
तो : बघतोच!
ती : हे बघा...
तो : हे काय?
ती : लाल कार्ड! रिमोट द्या आणि झोपा आता निमूट!!
तो : ....

Web Title: editorial dhing tang british nandi article