उडान! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

मोटाभाई : (सुस्कारा टाकत) हसावं की रडावं? रडावं की हसावं? कळत नाही!
नमोजी : (योगासनांच्या म्याटवर निरिच्छपणे) थोडा हसायच्या, थोडा रडायच्या!
मोटाभाई : (गुडघे चोळत) हसायला लागलं की रडू येतं, रडायला आलं की हसायला होतं!
नमोजी : (आयुर्वेदिक उपचार सुचवत) रोज रात्री झोपताना हिंग्वाष्टक चूर्ण गरम पाण्यात घ्या!!
मोटाभाई : (शंकाकुल आवाजात) त्यानं काय होईल?
नमोजी : (खुलासा करत) रडायला येत असेल तर हसायला होईल, हसत बसलात तर-
मोटाभाई : (कपाळावर हात मारत) तेच तर आत्ताही होतंय! त्यासाठी हिंग्वाष्टक चूर्णाची गरज काय?
नमोजी : (प्राणायामाची तयारी करत) तमे छुट्‌टी लै लो!!
मोटाभाई : (अमान्य करत) हवे बहु काम पडा छे!! दोन हजार ओगणीसमां इलेक्‍सन थया, तो अमणां-
नमोजी : (त्यांना थांबवत) ओगणीसच्या इलेक्‍सन माझ्याउप्पर सोडा!! जस्ट डोण्ट वरी!!
मोटाभाई : (पुन्हा गुडघे चोळत) वरी करु नको तर काय करु? राजस्थान गयु, मध्य प्रदेश गयु, छत्तीसगडमां तो सूपडा साफ थई गया...
नमोजी : (दिलासा देत) अरे, ए तो च्याले! इलेक्‍सन छे!! लेकिन हम अभी हारेंगे नही! लखीने राख्खो!!
मोटाभाई : (चेहरा किंचित उजळून) राफेल डीलच्या केसमधी सुप्रीम कॉर्टने क्‍लीन चिट दिला, हे च्यांगला झाला!!
नमोजी : (योगाम्याटवर मांडी घालून) बोललो होतो के नाय! अरे भाई, झूठ के पैर नहीं होते, अने सत्य परेशान तो होता है, लेकिन पराजित नहीं!
मोटाभाई : (मान हलवत) काले रडत होतो, आज हसायला येते!! सेम प्रोब्लेम कंटिन्यू!!
नमोजी : (दुर्लक्ष करत) राफेल डील मां रत्तिभर पण गडबड नथी! एकदम दूधजेवा सफेद डील छे!!
मोटाभाई : (चेहरा उजळून) तो आता आपण इलेक्‍सन हारणार नाय के?
नमोजी : (प्राणायामाच्या पोजमध्ये) चोक्‍कस!
मोटाभाई : (डोळ्यात पाणी आणत) पण कोंग्रेसवाल्यांनी आपली किती छळणूक केली!! कितना भी किचड उछालो, सूरज का तेज कभी कम नहीं होता!!
नमोजी : (उच्छ्वास सोडत) बहु सरस!
मोटाभाई : (सुटकेचा निःश्‍वास सोडत) बरा झ्याला के क्‍लीन चिट मिळाली!! मला टेन्सनच आला होता!! बे-त्रण दिवस दिवस मी घराबाहेर पण पडला नाय!!
नमोजी : (जोरात श्‍वास सोडत) मी पण!
मोटाभाई : (रागारागाने) कोंग्रेसवाल्यांना मी आता सोडणार नाय! किती खोटं बोलायचं, ह्याला काय लिमिट? अरे, चोर पकडाय, चट्‌टु पकडाय, पण खोट्‌टु ना पकडाय!!
नमोजी : (दीर्घ श्‍वास घेत) हिंदी में वात करो, आप दिल्ली में हो!
मोटाभाई : (ओशाळून) चोर पकडला जातो, स्वार्थी माणूसही उघडा पडतो, पण खोटं बोलणं धकून जातं!!
नमोजी : (चमकून बघत) हे मला बोलले काय तुम्ही?
मोटाभाई : (अजीजीने) अरे तुम्हाला कशाला बोलेल? तमे तो अमारा तारणहार छो!!
नमोजी : (आदेश देत) तो आता कामाला लागा! नाणुं मळशे, पण टाणुं नथी मळशे!!
मोटाभाई : (लगबगीने उठत) च्यालो, डाळ बगडे तो दिवस बगडे, अथाणु बगडे तो वरस!!
नमोजी : (पटापट सूचना करत) तमे जावो! हूं पछी आवीश!!
मोटाभाई : (कुतूहलाने विचारत)...क्‍यां जावानुं छे?
नमोजी : (विजयी मुद्रेने) अरे जो एरोप्लेन हमें ले डूबेगा, ऐसा कहते थे, उसीसे उडान भरेंगे! क्‍यूं? सांभळ्यो के नथी सांभळ्यो? आव जो!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com